आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंटी-बबलीने घातला गंडा:क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाची साडेनऊ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाची साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अब्दुल वारी नझीर (वय 32, रा. पुणे) या तरुणाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रांत ईश्वर गर्ग, नैना देवेंद्र जॉन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, नैना देवेंद्र जॉन हिचा सलमान हा मित्र आहे. संशयित नैना आणि विक्रांतने सलमानच्या औळखीचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्याला दोघांनी मिळून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) देतो असे सांगितले. यासाठी दोघांनी सलमानकडून वेळोवेळी तब्बल 9 लाख 39 हजार 938 रुपये बँकखात्यातून ट्रान्सफर करून घेतले.

काही दिवसानंतर सलमानने दोघांना क्रिप्टोकरन्सीची मागणी केली. मात्र, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. सलमान सातत्याने त्यांना फोन करू लागला. मात्र, त्यांनी त्यांच्या कुठल्यास फोनला उत्तर दिले नाही. यानंतर सलमानला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब लष्कर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस पवार हे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...