आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:आयपीएलवर सट्टा घेणारे नऊ सट्टेबाज गजाआड

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ सट्टेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून संगणक, तीन लॅपटॅाप, १८ मोबाइल संच, ९२ हजारांची रोकड असा पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हेमंत गांधी, अजिंक्य कोळेकर, सचिन घोडके, यशप्रताप सिंह, धर्मेंद्र यादव, रिग्लम पटेल, अनुराग यादव, इंद्रजीत मुजुमदार, सतीश यादव अशी आरोपींची नावे आहेत.