आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:बारशाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या 9 मुली खडकवासला धरणात बुडाल्या, 7 जणींची सुखरूप सुटका; दोघींचा मृत्यू

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहराजवळील खडकवासला धरणा जवळ डोणजे, गोर्हे खुर्द याठिकाणी नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन बेपत्ता मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

खुशी संजय खुर्दे (वय 14), शीतल भगवान टीटोरे (वय 15) असे मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत. सर्व मुली मूळच्या बुलढाण्याच्या असून गोरेखुर्द या गावात गोरे खुर्द या गावात बारशाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी 9 मुली होण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व नऊ मुली पाण्यात बुडाल्या. सुदैवाने 7 जणी वाचल्या मात्र दोघींचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त झालेल्या प्रर्थामिक माहितीनुसार, डोनजे परिसरात गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत सोमवरी सकाळी पोहण्यासाठी नऊ मुली पाण्यात उतरलेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नऊ मुली पाण्यात बुडाल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली.

यावेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत.याबाबतची माहिती हवेली पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी बेपत्ता मुलींचा पाण्यात शोध सुरू केला आहे.