आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मला सीतारम म्‍हणाल्‍या:बारामती मतदारसंघात यंदा केंद्रातून कोणतीही तडजोड नाही; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केंद्रातून काही तरी तडजोड होते, या विचारातून कार्यकर्ते काम करत नाहीत. मात्र या वेळी केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या.

भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबवली जात आहे. त्यानुसार सीतारमण या तीनदिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात सीतारमण यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून केली. धायरी‌ येथील मुक्ताई गार्डन येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सीतारमण म्हणाल्या, अमेठी लोकसभा मतदारसंघात जर बदल होऊ शकतो, भाजपला विजय मिळू शकतो, तर मग बारामतीही आपण जिंकू शकतो. कार्यकर्त्यांनी बोगस मतदान थांबवण्यासोबतच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. मात्र, असे सांगण्याची मला आता भीती वाटते. कारण यामुळे काही प्रमाणात कार्यकर्ते निर्धास्त होतात. या ठिकाणचे काही बूथ कमजोर आहेत, ते मजबूत करा. बारामतीमधील प्रलंबित विकासकामांसाठी केंद्राकडून नक्की मदत करू व निधी देऊ, अशी ग्वाही सीतारमण यांनी या वेळी दिली.

‘केंद्रातील नेते बारामतीला येऊन बारामती विकास मॉडेलचे गुणगान गातात, त्यामुळे कार्यकर्त्यांना काम करताना अडचणी निर्माण होतात,’ असे मत आमदार राहुल कुल यांनी या वेळी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...