आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहू- पंढरपूर धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची हवाई पाहणी:नितीन गडकरी यांनी दिल्या पालखी मार्ग हरित करण्याच्या सूचना

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हवाई पाहणी केली. हा महामार्ग 'हरित मार्ग 'करण्यात यावा या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालखी स्थळांचा महामार्ग

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती - इंदापूर - अकलुज - बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड

पालखी मार्गावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारची वनौषधे असतील. विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मधल्या भागात 57 हजार 200 व दोन्ही बाजूस मिळून 18 हजार 840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...