आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा पॅकेजमध्ये असून 12 पालखी स्थळे आहे. तर, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन पॅकेजमध्ये असून दाेन्ही पालखी मार्गाचे काम जलद गतीने करण्यात येत आहे. या मार्गावर 11 पालखी स्थळे आहे. एक वर्षाचे आत पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. नवीन वर्षात सुरुवातीलाच पालखी मार्ग वारकऱ्यांना उपलब्ध हाेईल.
आगामी तीन महिन्याचे आत 60 ते 70 टक्के काम या मार्गाचे पूर्ण हाेईल आणि डिसेंबर अखेर पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. पुढील वर्षी पालखी मार्गाचे उदघाटन करण्यात येणार आहे, अशी घाेषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
गडकरी म्हणाले,पालखी मार्गावर दुपदरी रस्ता चाैपदरी करण्यात आलेला आहे. शेवगाव येथे गजानन पालखी मार्गावर टाईल्स लावून मध्ये गवत लावण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे पाय भाजत नाही. अशाचप्रकारे या मार्गावर व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. पालखी मार्गावर 12 पालखी स्थळे आहे त्याठिकाणी लाेकांना ये-जा करण्यासाठी व्यवस्था असावी. दहा हजार लाेकांचे एकत्रिकरण हाेईल असा हाॅल, शाैचालय, पालखी मुक्काम निवासस्थान ठिकाणी व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरु आहे. पालखी मार्ग हा आपल्या सर्वांसाठी आस्थेचा विषय आहे. त्यामुळे भक्ती मार्ग असा हा मार्ग तयार करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एकूण सहा पॅकेज असून त्यापैकी पाच पॅकेजची कामे पूर्ण झाली आहे. पालखी मार्ग करण्याचे काम मला मिळाले हे माझे भाग्य आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, सदर महामार्गावर सेवा रस्ते, छाेटया गावात बायपास, पूल, भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहे. यादरम्यान जे वृक्ष काढण्यात आले त्याचे पुर्नराेपण करण्यात येते. कडुनिंबाचे सहा हजार 302 वडाचे दाेन हजार 885, पिंपळचे तीन हजार, जांबूळचे दाेन हजार, चिंचचे एक हजार, उंबर 380 अशी झाडे लावण्यात आली असून एकूण 18 हजार झाडे पूर्नराेपण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिनी चांदणी चाैकाचे उदघाटन
गडकरी म्हणाले,पुणे शहरातील चांदणी चाैकातील मुंबई- बँगलाेर महामार्गावरील काम वेगाने सुरु आहे. एक मे राेजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचे उदघाटन हाेईल. पुणे ते नागपूर अंतर पाच तासात पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नागपूर ते मुंबई सहा तासात करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून नवीन महामार्ग तयार करण्यात येत आहे. दाैंड ते बारामती पासून थेट जेएनपीटी पर्यंत दुमार्गी रेल्वे सेवा सुरु झाल्यास वाहतूक कमी हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.