आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चू कडू म्‍हणाले:सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार होतोच

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार कोणाचेही असले तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे देणारा तरुण पुढे जातो व अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्याचा विषय असला पाहिजे. सदाभाऊ राजकीय नेत्यांना रेडे म्हणाले तरी हे रेडे लोकाहिताचे असले पाहिजेत, असे मत माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. ते वास्तव कट्टा व अर्हम फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसह संवाद कार्यक्रमात बोलत होते. या वेळी माजी मंत्री बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...