आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलेबाजी:मी परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी बोलावले नव्हते; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरला परत जाईन असे म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलेच नव्हते : अजित पवार

पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला लगावला आहे.

'एकजण म्हणतो मी पुन्हा येईन दुसरा म्हणतो मी परत जाईन पण तुम्हाला बोलवले कुणी होते' असे म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले की, लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामे व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होते, असे म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser