आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:त्रिपुरात काय घडले हे कुणालाही माहीत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही, हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे? अमरावतीमध्ये जे घडलं ती हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ‘अब हिंदू मार नहीं खाएगा,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.‌ पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असती तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, त्रिपुरामध्ये घटना काय घडली हे नीट कुणालाही माहिती नाही. त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला गेला. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. १५-२० हजार संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांची कार्यालयाची तोडफोड करायची. याचा काय संबंध आहे? अशी विचारणाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...