आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:बारामतीसाठी वेगळे मिशन नाही : फडणवीस

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे मिशन महाराष्ट्र, मिशन इंडिया चाललेला आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते त्याच्यामुळे बारामती हे वेगळं नाही, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिशन बारामतीबाबत मांडली.

पुणे दौऱ्यावर आले असता फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेश मधील अमेठी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने पराभव केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी सदर मतदार संघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपवण्यात आली आहे या दृष्टीने सीतारमण या बारामतीच्या दौऱ्यावर येणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिवसभर बारामती लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी गाठीभेटी देऊन कार्यकर्त्यांची घेतलेले आहे. त्यासंदर्भात फडणवीस बोलत होते. दरम्यान,सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबद्दल बुधवारी झालेल्या सुनावणीबाबत आपल्याला माहिती नाही. याबाबत कोर्टात केसची सुनावणी सुरू आहे त्यावर बोलणं योग्य नाही. कोर्टाबद्दल बोलताना आपण जबाबदारीने बोलले पाहिजे. आमच्या सोबत ओरिजिनल शिवसेना आहे,आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबत एकत्र बसून ठरवू,आमचा फक्त मुंबई पॅटर्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. माझा पुणे दौरा राजकीय हेतूचा नाही. उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी मी पुरंदर येथे आलो आहे. रामोशी समाज मागे राहून गेला आहे. त्यामुळे नवीन सरकार त्याच्या प्रश्न सोडवेल,असे फडणवीस म्हणाले.

शिंदे गटाची शिवसेना खरी, उर्वरित शिवसेनेचे माहीत नाही एकनाथ शिंदे गटाची जी खरी शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे. बाकी उरलेले शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही मात्र मीडियाने उगाच पतंगबाजी करू नये असंदेखील वक्तव्य फडणवीस यांनी पुणे विमानतळावर उतरल्यानंतर माध्यमांशी बोलताना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...