आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलगडला नोबेल पुरस्काराचा प्रवास!:नोबेल पुरस्कार प्राप्त रिचर्ड रॉबर्ट्स यांची पुणे विद्यापीठाला भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनात मला कोडी सोडवायला फार आवडायचे, त्यातूनच पुढे गणित विषयाची आवड निर्माण झाली. माझ्या नोबेल पर्यंतच्या वाटचालीत मला अनेक चांगले प्राध्यापक मिळाले ज्यांच्यामुळे मला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि नवे प्रयोग करता आले, असे सांगत 1993 साली मेडीसिन मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या रिचर्ड रॉबर्ट यांनी बुधवारी आपला प्रवास उलगडला.

विद्यापीठाविषयी जाणून घेतले

रिचर्ड रॉबर्ट यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांचीही भेट घेत विद्यापीठाविषयी जाणून घेतले. विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ शेखर मांडे, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कुंभार, इनोवेशन सेलचे संचालक डॉ. संजय ढोले यांच्यासह अनेक प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

रिचर्ड रॉबर्ट यांनी विद्यापीठाविषयी जाणून घेतले.
रिचर्ड रॉबर्ट यांनी विद्यापीठाविषयी जाणून घेतले.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी रिचर्ड रॉबर्ट यांनी विद्यापीठातील राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात 'नोबेल पारितोषिकापर्यंतची वाटचाल' या विषयावर व्याख्यान दिले. या त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर त्यांनी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांशी देखील मुक्त संवाद साधला.

काय म्हणाले रिचर्ड रॉबर्ट?

विज्ञान केंद्रात बोलताना रिचर्ड रॉबर्ट यांनी त्यांच्या जनुकांविषयी केलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही अयशस्वी होता तेव्हा निसर्ग तुम्हाला काही वेगळं सांगू इच्छित असतो. या अपयशातूनच मीही शिकलो. विकसनशील देशांसाठी अनुवंशिकरित्या सुधारित पीक (GMO) घेणे चांगली बाब आहे. भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश आहे. त्यामुळे येथील हवामानाचा अभ्यास करून अनुवंशिकरीत्या सुधारित पीक घेणे फायदेशीर ठरू शकते, असे ते म्हणाले. प्रत्येक जीव आणि पिकामध्ये अनुवंशिकरित्या बदल हा होतच असतो. विकसनशील देशात असे पीक घेणे ही स्वागतार्ह बाब आहे, त्यामुळे देश पुढे जाण्यास मदत होईल.

विभागप्रमुख आणि अन्य जिज्ञासूंची उसळली गर्दी

रिचर्ड राॅबर्ट्स यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, विभागप्रमुख आणि अन्य जिज्ञासूंची देखिल गर्दी उसळली होती. व्याख्यानानंतर रिचर्ड यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना शंका विचारण्याचे आवाहन केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

बातम्या आणखी आहेत...