आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत देशात जवळपास दीड लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकट्या महाराष्ट्र राज्यात 60 हजार नवे प्रकरणे समोर आली आहेत. जगातील अमेरिका आणि ब्राझील देश सोडल्यास त्यानंतर भारताचा नंबर येत आहे. राज्यात आतापर्यंत 33 लाख लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. राज्यातील सर्वच शहराची स्थिती कोरोनामुळे भयावह होत चालली आहे. त्यातच पुणे शहरात कोरोनाचे एवढे नवीन कसे वाढले याचा आढावा घेऊया.
पुणे शहरात कोरोनाचे नवीन रुग्ण दहा पटीने वाढले आहे. गेल्या वर्षी हॉस्पीटलमध्ये कोरोनामुळे दाखल व्हायला 10 लोक यायचे. परंतु, यावर्षी जवळपास 100 लोक येत आहे. त्यामुळे पुण्यातील प्राईम हॉस्पिटल, लाइफ लाइन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, सिरीन आणि सुसुन हॉसिटल हे प्रमुख हॉस्पिटल पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. दरम्यान, या हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड नसून नव्या रुग्णांना दाखल करण्याकरीता बेडच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे प्रायवेट हॉस्पिटल हॉटेल भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये रुग्णांवर उपचार करत आहे.
पुण्यात 110 हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार, कुठेही बेड खाली नाही
पुणे शहरात प्राईम हॉस्पिटल, लाइफ लाइन हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, सिरीन आणि सुसुन हॉसिटल हे प्रमुख हॉस्पिटल आहेत. यासह इतर हॉस्पिटलमध्येदेखील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही आहे. त्यामुळे नवीन रुग्णांना दाखल करण्याकरीता मोठी पंचाईत निर्माण होत आहे.
पुणे शहरात ह्या गोष्टीमुळे वाढला कोरोना
हॉस्पिटलची वर्तमान स्थिती
टोटल बेड्स - 3300
ऑक्सिजन बेड्स - 2200
व्हेंटिलेटर बेड्स - 290
पुढे एवढ्या बेड्सची गरज
टोटल बेड्स - 7500
ऑक्सिजन बेड्स - 4800
व्हेंटिलेटर बेड्स - 551
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.