आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मंदिराच्या ठिकाणी मशिदी आल्या:मात्र, प्रत्येकाने इतिहास उकरून काढू नये; रामदास आठवलेंचे आवाहन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मंदिराच्या ठिकाणी मशिदी आल्या. मात्र, प्रत्येकाने इतिहास उकरून काढू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. राम जन्मभूमीच्या प्रश्नसाठी अनेक वर्ष लढा सुरू होता. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून यश मिळाले आहे. सध्या राम जन्मभूमीवर चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येक मशिदीमध्ये पिंड अशा पद्धतीचा इतिहास खरा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले आठवले?

एक वेळ अशी होती की, आपला सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर हिंदू झाला. त्यानंतर मुघल आले आणि हिंदू लोक मुस्लिम झाले. त्यामुळे काही ठिकाणी मंदिर होती. त्या ठिकाणी मशिदी आल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली ती योग्य असून प्रत्येकाने इतिहास उकरून काढण्याची गरज नाही. मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

न्यायालयाचा निर्णय मान्य

आठवले म्हणाले, काही ठिकाणी मंदिरे होती आणि तिथे मशिदी आल्या ही गोष्ट खरी,पण…मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसेच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे

बातम्या आणखी आहेत...