आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:42 लाख अनुदानप्रकरणी कुस्तीगीर परिषदेला नोटीस, अनुदानप्रकरणी अहवाल मागवून घेतला

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकाेरिया यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेेसाठी दिलेल्या ४२ लाखांच्या अनुदानप्रकरणी अहवाल मागवून घेतला आहे. तसेच सिटी कॉर्पोरेशनसोबत झालेला प्रायोजक करारनामा सादर करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे येथे २ ते ७ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेसाठी शासनाकडून ४२ लाख १८ हजार रुपये परिषदेला देण्यात आले हाेते. त्याच्या खर्चाचा अहवाल परिषदेने सादर केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...