आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:पालक व विद्यार्थ्यांसाठीही आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वर्ग!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणात, शिक्षण पद्धतीत, अध्यापन आणि मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल हाेत आहेत. शिक्षक आणि शिक्षणसंस्थांसोबत पालक आणि विद्यार्थी हा देखील महत्वाचा घटक आहे. त्यांच्यापर्यंत या बदलांची आणि या बदलांमधील विचारांची माहिती प्रभावीपणे पोहोचावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्रातील हा पालक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शनाचा पहिला अभिनव प्रयोग असणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे व व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर उपस्थित होते.