आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी आरक्षण:आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नकोत - पंकजा मुंडे; ओबीसी आरक्षण चिंतन मेळाव्यात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाघ अामच्या इशाऱ्यावर चालतो : वडेट्टीवार

ओबीसींच्या आरक्षणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी त्वरीत प्रयत्नांना सुरुवात व्हावी, केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा राज्याला द्यावा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे ठराव रविवारी लोणावळा येथे आयोजित ओबीसी चिंतन शिबिरात आग्रहपूर्वक मांडण्यात आले.

दोनदिवसीय ओबीसी आरक्षण चिंतन आणि मंथन शिबिरात रविवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते पंकजा मंुडे, चंद्रशेखर बावनकुळे असे सर्वपक्षीय ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सर्वपक्षीय नेत्यांनी हे आरक्षण पुनर्स्थापित करावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी परिवर्तनाचा लढा आणि एकत्रित संघर्ष आवश्यक आहे, असे सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, असेही पंकजा यांनी सुचवले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘जिथे समाजहिताची बाब आहे तिथे पक्षातीत भूमिका घेतली असल्याचे सांगून पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ही भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

वाघ अामच्या इशाऱ्यावर चालतो : वडेट्टीवार
वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असे वक्तव्य करून इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. यापूर्वीही लॉकडाऊनचे निर्णय घाईगर्दीने जाहीर करून वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतली होती, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे नाराजी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...