आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Obc Political Reservation Updates: Pankaja Munde Blows The Trumpet Of OBC Movement From Pune, Pimpri Chinchwad !; News And Live Updates

ओबीसींचे राजकीय आरक्षण:पंकजा मुंडे यांनी पुणे, पिंपरी चिंचवड मधून फुंकले ओबीसी आंदोलनाचे रणशिंग!; ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा व्होट बॅंकेचा नसून सन्मानाचा - मुंडे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 जूनचे चक्का जाम आंदोलन लक्षवेधी करण्याचे पदाधिकाऱ्यांना केले आवाहन

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवड मधून ओबीसी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा हा 'व्होट बँकेचा' नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा असल्याचे त्या म्हणाल्या. 26 जून रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाने शहर दणाणून सोडा असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने 26 जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, पिंपरीच्या महापौर मायताई ढोरे, उमाताई खापरे, सदाशिव खाडे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ॲड. मोरेश्वर शेडगे, अशोक मुंडे, योगेश पिंगळे, दत्ताभाऊ खाडे आदी उपस्थित होते.

संघर्ष ही आपली ताकद आहे. कोरोना महामारीनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मोठा विषय घेऊन आपण याची सुरवात करत आहोत. बहूजनांना ताकद देण्याचे काम ज्यांनी केले, ओबीसींच्या आरक्षणाचा पाया ज्यांनी रचला त्या छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 जून हया जन्मदिवशी आपण सामाजिक न्यायाची मागणी करत आहोत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा हा लढा कुठल्या व्होट बँकेसाठी नसून भाजपच्या मुळ तत्वांचा, सन्मानाचा आणि संस्काराचा आहे. समाजातील वंचित वर्गच जर धोक्यात येत असेल तर राष्ट्र धोक्यात येते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण 26 जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभाग घेऊन शहर दणाणून सोडावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. बैठकीनंतर विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेऊन पंकजाताई मुंडे यांनी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...