आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर अत्याचार करत हत्या:गावातून अचानक बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेह सापडला; आरोपी अटकेत

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवनानगर जवळील कोथुर्णे (ता. मावळ,पुणे) गावातून एका सात वर्षीय मुलीचे मंगळवारी अपहरण झाल्याची घटना घडली होती. स्वरा जनार्दन चांदेकर (वय 7) ही मुलगी मंगळवारी (2 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. अखेर बुधवारी तिचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत तेजस महिपती दळवी (वय -२४,रा. कोथूर्णे, ता.मावळ, पुणे) या आरोपीस अटक केली आहे.

गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर बुधवारी गावातीलच शाळेच्या पाठीमागे तिचा मृतदेह आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला. तिच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.दरम्यान, सदर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिली असून याप्रकरणी फरार झालेला आरोपी तेजस दळवी याचा एलसीबी पथकाच्या पोलिसांनी शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे अशी माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली आहे .याबाबत पुढील तपास कामशेत पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...