आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी नसलेली मालमत्ता जप्त केली:संजय राऊत यांचा दावा, ईडीच्या कारवायांना 2024 नंतर उत्तर देण्याचा इशारा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांचा भाजपला इशारा

माझी नसलेली मालमत्ता ईडीने जप्त केली. आता ईडीच्या कारवायांना 2024 नंतर उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजय राऊत आणि शरद पवारांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

...तर श्रीलंकेसारखी ठिणगी पडेल

संजय राऊत म्हणाले की, देशात भाजपचे राज्य आहे. त्यांना महागाईवरून लक्ष हटवायचे आहे आणि ज्ञानव्यापी, शिवलिंग असे विषय काढले जातात. काही लोकांना आपल्या देशाची तुलना श्रीलंकेशी केलेली आवडत नाही. मात्र, श्रीलंकेसारखी ठिणगी इथे पडायला वेळ लागणार नाही. माझ्यासारख्या माणसाने नसलेली प्रॉपर्टी कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतली. आणि म्हणतात अटक करणार अटक करणार मी सांगितले मी दिल्लीत बसलोय मला अटक करा, असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

भाजपने विरोधात बसायची तयारी ठेवावी

संजय राऊत म्हणाले की, भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी. पुढील अडीच वर्षेही सुखरूप पूर्ण होतील. महाराष्ट्र लढणारा आहे. कोणासमोरही झुकणार नाही. देशामध्ये बदल घडवण्याची महाराष्ट्राची ताकद आहे. मी बाळासाहेबांनाही पाहिले आणि शरद पवारांना पाहिले. दोघेही लोकांमध्ये राहतात. तीच त्यांची ऊर्जा आहे. पवारांमध्ये कोणताही बदल नाही. तेच आहेत तसेच आहेत. भाजपच्या लोकांवर ईडीचे छापे पडत नाहीत. याचे 2024 नंतर उत्तर देतो. आमचेही दिवस येतील, असा इशारा त्यांनी दिला.

बाळासाहेबांची करून दिली आठवण

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब असते तर हे असे उद्योग करण्याची हिंमत झाली नसती. हे लोक तेव्हाही मातोश्रीत येण्यास घाबरत होते आणि आताही घाबरतात. नक्कीच त्यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा आणि आताही आमच्या पक्षामध्ये मोठे लढवय्ये लोक आहेत. अजूनही त्यांची भूमिका त्यांच्याच भाषेत लिहिली जाते. बाळासाहेब असते, तर आज जे उपद्वव्याप करतात ते झाले नसते. ते बाळासाहेबांना चळाचळा कापायचे. आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत. अंगावर आला तरीत आम्ही शिंगावर घेतो, असा इशाराही त्यांनी दिला.

त्यांची शिकवणी घ्यायला तयार

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण, प्रभाव राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र व्यासपीठ शेअर केलेय. आता जो संभ्रम निर्माण करतायत, त्यांना बाळासाहेबाचे विचार माहित नाही. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मनातले सरकार आणायला भाग पाडले. असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...