आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेगा नहीं...:वाढदिवसाच्या अदल्या दिवशी खासदार उदयनराजे भोसलेंचा पुष्पा अवतार चर्चेत; साताऱ्यातील कार्यक्रमात म्हणाले- 'झुकेगा नहीं साला..!'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे ओळखले जातात. उदरनराजे यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उदयनराजे भोसले यांना चाहत्यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके स्टाईलने ‘पुष्पा..पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला..।’ असा डायलॉग म्हटला.. आणि चाहत्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला.

पुन्हा उडवली शर्टची कॉलर

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. उदयनराजेंवर देखील 'पुष्पा' सिनेमाचा प्रभाव दिसून आला. उदयनराजे दुसऱ्यांदा शर्टची कॉलर उडवत सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले. मंगळवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात त्यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉग मारत नेहमीप्रमाने कॉलर उडवली.

बातम्या आणखी आहेत...