आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या सांगतेच्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी खास मध्यान्ह समयीच्या राग वृंदावनी सारंग मधील ख्यालाने झाली. गायनाला प्रारंभ करताना स्वतः आनंद भाटे यांनी या गोष्टीचा उल्लेख केला.
' महोत्सवात आजपर्यंत मी अनेकदा संध्याकाळचे राग गायले आहेत. यंदा मी खास दुपारच्या वेळ निवडली असून, यावेळेत गायनाची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे सांगत त्यांनी वृंदावनी सारंग मधील विलंबित बंदिश 'तुम रब तुम साहेब '(झपतालात निबद्ध), आणि द्रुत बंदिश 'जाऊ मै तोपे बलिहारी' सादर केली. त्यानंतर 'मन राम रंगी रंगले' ही अभंगरचना आणि 'बाजे रे मुरलिया बाजे ' ही भक्तीरचना भावपूर्णतेने सादर केली. रसिकांच्या आग्रहाखातर मानापमान नाटकातील 'युवतीमना दारुण रण रुचिर प्रेम से' हे पदही सादर केले.
त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), ललित देशपांडे व आशिष रानडे (तानपुरा) यांनी साथ केली.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाचे इतर कलाकार असे आहेत.बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन होईल. पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन यानंतर सादर होईल. प्रसिद्ध गायक महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांच्या हिंदुस्थानी- कर्नाटक संगीत जुगलबंदीचा आनंद देखील रसिकांना या दिवशी घेता येईल.
गेली बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचा नृत्याविष्कार बघण्याची संधी यानंतर उपस्थित रसिकांना मिळेल. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने 68 व्या सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.