आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:हडपसरमध्ये बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली. या वेळी त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अमोल बाळासाहेब बोरकर (३८, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केल्याचे नाव आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना युनिट तीनचे अंमलदार राकेश टेकावडे यांना एक अनोळखी व्यक्ती हडपसर येथील ससाणेनगरमधील गंधर्व हॉटेलजवळ संशयितरीत्या थांबली असल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे गावठी कट्टा (पिस्टल) असल्याचे कळाले. त्यानुसार त्याला सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल लावल्याचे आढळले. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले.

बातम्या आणखी आहेत...