आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्याला फेकले कचऱ्यात, सामाजिक कार्यकर्त्यांकडून चिमुकलीला जीवदान

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात एका दिवसाची चिमुकली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली. बुधवारी त्या चिमुकलीचा आवाज ऐकून एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी सांगितले की, सध्या मुलीची तब्येत ठीक आहे.

मॉर्निंग वॉकवर गेलेल्या लोकांना कचऱ्यात आढळली चिमुकली

काळेवाडीमधील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत नढे, इरफान शेख आणि रोहित कदम बुधवारी सकाळी 6.30 वाजता मॉर्निंग वॉकवर गेले होते. काळेवाडी परिसरातील तापकीर चौकातील कचऱ्यात त्यांना एका मुलीचा रडण्याच्या आवाज आला. याबाबत प्रशांत यांनी सांगितले की,' जीजा माई हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीचा जन्म एका दिवसापूर्वीच झाला आहे. चिमुकली निरोगी असल्यामुळे तिची प्रकृती सध्या ठीक आहे. तरी खबरदारी म्हणून तिला आयसीयूत ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...