आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागातून खून:व्यसनमुक्ती केंद्रात गळा आवळून एकाचा खून

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल दाेन व्यक्तींमध्ये शाब्दिक वादविवाद झाला. या भांडणाच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या व्यक्तीचा टाॅवेलने गळा आवळून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. अजिंक्य सुरेश गुळमिरे (३५, रा. सांगाेला, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पाेलिसांनी साैरभ गणेश सावळे (२०, रा. काेथरूड) यास अटक केली आहे. याबाबत युनिक फाउंडेशनतर्फे मयूर प्रधान (४०, रा. धायरी, पुणे) यांनी सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना ३१ ऑगस्ट राेजी संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान युनिक फाउंडेशन येथे घडली . धायरीतील युनिक फाउंडेशन या व्यसनमुक्ती केंद्रात एक महिन्यापूर्वी अजिंक्य गुळमिरे हे उपचारासाठी दाखल झाले हाेते. ३१ ऑगस्ट राेजी सदर केंद्रातील दुसऱ्या मजल्यावर अजिंक्य गुळमिरे व साैरभ सावळे यांची किरकाेळ कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. याचा राग मनात धरून साैरभ सावळे याने टाॅवेलने अजिंक्य गुळमिरे यांचा गळा आवळून ठार मारले. ही घटना घडल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रात गाेंधळ उडाला. याबाबतची माहिती सिंहगड राेड पाेलिसांना देण्यात आली. त्यांनी अजिंक्य गुळमिरे यास रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाेलिस उपायुक्त पाैर्णिमा गायकवाड, सहायक पाेलिस आयुक्त सुनील पवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...