आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी:पुणे विद्यापीठाचे एक हजार स्वयंसेवक वारीच्या स्वच्छतेसाठी उतरणार; रासेयो दिंडीचे 23 जूनला उद्घाटन

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक व खेळ मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र ह्यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभाग ह्यांच्या वतीने दिनांक 22 जून ते दिनांक 10 जुलै, 2022 या कालावधीत राज्यस्तरीय ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी - लोकशाही वारी दिंडीचे आयोजन केले आहे.

यामध्ये प्रामुख्याने दिनांक 22 ते 24 जून, 2022 या कालावधीत पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांमध्ये 1000 विद्यार्थ्यांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम आणि पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी महामार्गावर राज्यातील विविध विद्यापीठातील 200 विद्यार्थी स्वयंसेवक पूर्ण वेळ चालणार आहेत. या महामार्गावर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सहभागातून वारीमार्ग व परिसरातील गावांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण, आळंदी-देहू ते पंढरपूर ह्या दोन्ही आषाढीवारी मार्गावर स्वच्छता मोहिम, वापरलेल्या पत्रावळ्या व निर्माल्य संकलन, उघड्यावर शौचाला न बसता कृत्रिम शौचालय वापराबाबत प्रबोधन, गावकर्यांळची, शाळा-महाविद्यालयांची शौचालये उपलब्ध करणे, पथनाट्य पथकांच्या माध्यमातून गावांमध्ये पर्यावरणीय, लोकशाही व मतदान जनजागृतीसाठी लोकजागरण, वारीमार्गावर वारकरी व गावकर्यांमध्ये पर्यावरणीय उद्बोधन,संलग्नित महाविद्यालयांमार्फत सेंद्रीय खतनिर्मिती आणि शेतकर्यांकना मोफत सेंद्रीय खतवितरण असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती विद्यार्थी विविध योजना उपक्रम समितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिली.

या रासेयो दिंडीचे उद्घाटन दिनांक 23 जून, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह येथे संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय दिंडीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य आणि विद्यापीठ प्रशासनाचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे ह्या उपक्रमाचे आयोजन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...