आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पालकांना पाहता येणार निकाल
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाईन अर्जच करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
विहित मुदतीनंतर अर्ज घेणार नाही
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनातर्फे महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहत फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होणेचे दृष्टीने फेरफार अदालतीच्या वेळेस फेरफार अदालतीशिवाय जनतेच्या इतर कामकाजामध्ये 7/12 मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहित मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे. संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्विकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे उत्पन्नाचे व इतर दाखले वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी फेरफार अदालतीसाठी उपस्थित राहावे. मंडल अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.