आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:सव्वा कोटीहून अधिक भक्तांकडून दगडूशेठ गणपतीचे ऑनलाइन दर्शन

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने नागरिकांना घरबसल्या दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ट्रस्टच्या वेबसाइट, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियावर तब्बल १ कोटी २७ लाख ८७ हजार गणेशभक्तांनी भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आहे. ट्रस्टतर्फे सुरू झालेल्या उत्सव काळात व प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या काळात भारतासह परदेशातून लाखो गणेशभक्तांनी ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घेतला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी गणेशोत्सव सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाइटवरून दररोज २ लाख ५ हजार ८३३ हून अधिक भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाइटवरून दररोज सकाळी व रात्री होणारी लाइव्ह आरतीदेखील हजारो गणेशभक्त पाहत आहेत. तर, सुमारे ९५ लाख भाविक फेसबुकवरून, इन्स्टाग्रामवरून ६ लाख ३२ हजार, यूट्यूबवर २४ लाख आणि अ‍ॅपवरून ५० हजार गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल १ कोटी २७ लाख ८७ हजारहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाइन दर्शनाचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन अभिषेकाची नोंदणी करून सुविधेचा लाभ घेतला, तर डिजिटल माध्यमातून सामाजिक उपक्रमांनादेखील भक्त जोडले गेले आहेत. भारतातील मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, इंदूर, नागपूर, जयपूर, दिल्ली, चेन्नई, ठाणे, नवी मुंबई, कोलकाता, नाशिक, सुरत, वडोदरा आदी शहरांमध्ये बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड, ओमान, बेल्जियम, न्यूझीलंड, जपान, थायलंड, कतार, आयर्लंड, कुवेत आदी देशांतील गणेशभक्तांनी दगडूशेठच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियाला भेट दिली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, उत्सवकाळात दगडूशेठ गणपती मंदिर बंद राहणार असल्याने मंडळाचे कार्यकर्तेदेखील मंदिरात दर्शनासाठी जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनीदेखील मंदिराजवळ गर्दी करू नये. गणेशभक्तांनी घराबाहेर न पडता श्रींचे ऑनलाइन दर्शन घेण्याची व्यवस्था ट्रस्टने केली आहे. उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

1 कोटीहून अधिक भाविकांचे ऑनलाइन दर्शन
- फेसबुक९५,००,०००
- वेबसाइट २,०५,८३३
- इन्स्टाग्राम ६,३२,०००
- यूट्यूब २४,००,०००
- अ‍ॅप ५०,०००

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser