आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय खेळाडू तरुणीला डेटिंग ॲपवरील ओळख महागात:50 वर्षीय व्यक्तीकडून बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकालच्या तरुण आणि तरुणींमध्ये अॅपची मोठी क्रेझ आहे. यामुळे अनेकांकडून फसवणूक केली जाते. अशीच एक फसवणुकीची मोठी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका राष्ट्रीय खेळाडूला टिंडर डेटिंग अॅपची ही ओळख महागात पडली आहे. तिने या अॅपवरून एका 50 वर्षीय पुरुषासोबत मैत्री केली होती. मात्र, या पुरुषाने तिला विविध आमिष दाखवत तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही राष्ट्रीय खेळाडू आहे. तिने तिच्या मोबाइलमध्ये टिंडर डेटिंग अॅप डॉनलोड केले होते. यावेळी ती विविध मुलाशी बोलत होती. या अॅपवरून तिला एका 50 वर्षीय इसमाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती, तिने ती स्वीकारली. दोघे जण या अॅपच्या माध्यमातून गप्पा मारत होते. या माध्यमातून त्यांची चांगली ओळख झाली.

वेगवेगळ्या गोष्टींचे अमिष

दरम्यान या पुरुषाने या तरुणीला विविध आमिष दाखवली. त्यानंतर ते दोघे भेटू लागले. या पुरुषाने या तरुणीला मुंबई, पुणे येथील विविध ठिकाणी नेले. या ठिकाणी आरोपीने तरुणीला वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर ती ज्या व्यक्तीला डेट करत आहे तो 50 वर्षीय असून त्याचे लग्नही झाले असल्याचे लक्षात आले. तसेच त्यांना दोन मुले असल्याचे कळताच तिने डेक्कन पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे.

तरुणीची फसवणूक

सोशल मीडिया आणि टिंडरसारख्या डेटिंग अॅपवरून अनेक तरुणांची आणि तरुणीची फसवणूक होत असल्याच्या प्रकारात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. या माध्यमातून कुणाशी मैत्री करतांना अथवा आर्थिक व्यवहार करताना सर्व गोष्टी तपासून घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्ती यांच्याशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...