आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान..! तुमच्यासोबतही घडू शकतो असा प्रकार:गुगल रिव्ह्यू टास्कच्या बहाण्याने 34 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिग्रामवर कमिशन देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल 34 लाख 76 हजार रुपये फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी आरोपी विरोधात सायबर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

अकिक वासुदेव रानाडे (वय - ३०, नौपाडा, ठाणे) यांनी याबाबत आरोपीं विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आध्या रीधान, रेक्रुईट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि धर्मेश कुमार नावाचा अज्ञात मोबाईल धारक यांच्यावर पोलिसांनी आर्थिक फसवणुक आणि आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार २९/३/२०२३ ते १२/४/२०२३ यादरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मूळचे ठाण्यातील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहत आहे. टेलिग्रामवर रिक्रुटर्स झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत आध्या रीधान नावाची महिला आणि धर्मेशकुमार यांनी संगनमताने ऑनलाइन जॉब देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार गुगल रिव्ह्यू टास्क देऊन त्यावर कमिशन देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून लबाडीने एकूण 34 लाख 76 हजार 700 रुपये ऑनलाईन काढून घेत त्यांचे आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पुढील तपास करत आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक

अज्ञात मोबाईल क्रमांक धारकानी एचडीएफसी बँकेचे केवायसी अपडेट करण्यास सांगून, त्याबाबत ऑनलाईन लिंक पाठवून समीर शशिकांत रहाटे (वय -47 ,राहणार- मुंबई ) यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन केवायसी माहिती सबमिट केल्यानंतर, त्यांच्या माहितीचा वापर करून एक लाख रुपये परस्पर त्यांच्या बँक खात्यातून काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.