आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर हाती पडल्या बेड्या:ऑनलाइन जुगार खेळला, लाखो रुपये गमावले! मग झटपट पैसे कमावण्यासाठी निवडला घरफोडीचा मार्ग

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन जुगार खेळताना लाखो रुपये गमावल्याने एका इसमाने घरफोडी गुन्हे करत, झटपट पैसे मिळवण्याचा प्रकार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून 20 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे.

मुकेश बबन मुने (वय -26, रा. दत्त मंदिराजवळ, सुतारदरा, कोथरूड,पुणे) आणि त्याचा साथीदार नितीन सुरेश बागडे (वय -32, रा. कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपीची नावे आहेत. मुकेश मुने हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असून त्याच्यावर 35 गुन्हे दाखल आहे. तर नितीन बागडेचे पुर्वी सोनाराचे दुकान होते.

पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार यांचे मार्च 2023 मध्ये घोरफोडीतील सोपान बागेतील बंगल्यात बंगला नुतनी करणाचे काम चालू असताना, अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून कपाटाचे डिजीटल लॉकर उघडून त्यातील सोने, चांदी, हिरे, दागिने आणि विदेशी चलन असा 40 लाखांचा मौल्यवान ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणात वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून 100 हून अधिक सराईत घरफोडी करणार्‍यांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान संबधित गुन्हा मुकेश मुने याने केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो सध्या ठाण्यातील भिवंडी येथे रहाण्यास गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस त्याचा ठाण्यात शोध घेत असताना त्याचा मित्र नितीन बागडे याच्यासोबत पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघे खराडी चौकात आले असताना दोघांनाही युनिट पाचच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी चोरीचा ऐवज अहमदनगर येथील सोनारांना विकल्याचे सांगितले. ज्या सोनारांना सोने विकण्यात आला होता त्या सोनारांकडून तसेच आरोपींकडून 20 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मुने याला ऑनलाईन बिंगो जुगाराचा नाद लागला होता. त्यापायी लाखो रूपये हरल्याचे त्याने तपासात सांगितले.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, अवनिाश लाहोटे, अमंलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर यांच्या पथकाने केली आहे.