आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पी वाय सी पुणे येथे भारतीय रिझर्व बँकेच्या निगराणीखाली राष्ट्रीय सखोल जागरूकता अभियानाच्या अंतर्गत टाऊन हॉल सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे नियंत्रित करण्यात येत असलेल्या सर्व बँक व वित्तीय संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेमध्ये सुमारे १००० ग्राहक सहभागी झाले होते व या सभेचे थेट प्रक्षेपण पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकाच वेळेस दाखविण्यात आले.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक व बँकिंग लोकपाल क्रमांक मुंबई-II येथील डॉ. सुशांत कुमार कार या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपसरव्यवस्थापक व बँकिंग उपलोकपाल मुंबई-II राजकुमार पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्राहकसेवांची काळजी घेणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या मध्यवर्ती बँका जगभरात फारच थोड्या असल्याचे मुंबई येथील भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक व बँकिंग लोकपाल डॉ सुशांत कुमार कार यांनी कार्यक्रमास संबोधित करताना सांगितले. भारतीय रिझर्व बँक ही नियामक असल्यामुळे वित्तीय प्रणालीतील ग्राहकसेवेची संरक्षक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. ग्राहक सेवा सर्वोत्तम असावी व ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती व्हावी हे भारतीय रिझर्व बँकेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय रिझर्व बँक नियंत्रित संस्था असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रासारख्या मशालजीच्या नेतृत्वाखाली सर्व बँका व वित्तीय संस्था या संदर्भात करीत असलेल्या कार्याचे व महाराष्ट्र राज्यभरात आयोजित केलेल्या जागरूकता अभियानाचे डॉ. सुशांत कुमार कार यांनी कौतुक केले. राज्य अग्रणी बँक समितीचे निमंत्रक व बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक व्ही. एन. कांबळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मध्यम लघु व सूक्ष्म उपक्रम व रिटेल बँकिंग विभागाचे सरव्यवस्थापक अरुण कबाडे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शहर विभागाचे विभागीय व्यवस्थापक व सरव्यवस्थापक राजेश सिंह, सर्व पदाधिकारी, विविध बँका व प्रादेशिक कार्यालयांचे प्रमुख व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. पुणे जिल्ह्याचे अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.