आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भारत जोडो यात्रा:शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन; असंख्य कार्यकर्त्यांचा होता सहभाग

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (3 नोव्हेंबरला) शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले. सदरील राहुल गांधी यांच्या समर्थनाथ मोटार सायकल रॅली आयोजित केली होती.

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी गृहराज्य मंत्री आ. सतेज पाटील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली फिरून आगाखान पॅलेस येथे तीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी गृहराज्य मंत्री आ. सतेज पाटील म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी हे कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत भारतात तयार झालेले विषमतेचे वातावरण धर्म व जातीमधील तेढ तसेच देशातील याच्या विरोधात भारत जोडण्यासाठी यात्रा करीत आहेत. या यात्रेला संपूर्ण भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून, पुण्यात देखील आज या समर्थनार्थ मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, गेल्या आठ वर्षांमध्ये या देशामध्ये माणासांमाणसांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काही जातीयवादी शक्ती करीत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या विरोधात भारत जोडो यात्रा काढीत आहेत. या यात्रेमध्ये सर्वसामान्यांबरोबरच बुध्दीजीवी वर्ग सुध्दा जोडला जात असून देश एकसंघ ठेवण्यासाठी या यात्रेचा उपयोग होत आहे.

यावेळी भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, प्रशांत बधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक मानकर, शुक्राचार्य वांजळे, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, नगरसेवक चंदूशेठ कदम, दत्ता बहिरट, बाळासाहेब दाभेकर, विजय खळदकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, नीता रजपूत, शिवाजी केदारी, आदींसह पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...