आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त, सात राज्यांमध्ये पसरलेल्या भारतीय सैन्याच्या सदर्न कमांड क्षेत्रात 18 प्रमुख ठिकाणी ‘सदर्न स्टार विजय रन’शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील 50 हजारहून अधिक सदस्यांसह, स्त्रिया आणि शाळकरी मुलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या रनमध्ये सर्वजण खांद्याला खांदा लावून आणि आपल्या फौजी बंधूंशी जुळवून घेत सामील झाले होते. ‘सैनिकांसाठी धावा, सैनिकांसह धावा’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.
पुणे येथे चार हजारहून अधिक उत्साही सहभागींसह पुणे रेसकोर्सच्या निसर्गरम्य वातावरणातून या रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 12.5 किमी (खुली श्रेणी), 5 किमी (मुले) आणि 4 किमी (महिला) या तीन श्रेणीतील दौडला लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट
जनरल ए. के. सिंग यांनी झेंडा दाखवून रवाना केले. विविध 18 ठिकाणी जनसमुदायाला संबोधित करताना, आर्मी कमांडर यांनी 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाच्या आठवणी जागवल्या , तसेच भारतीय सैन्याची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी कमांड असलेल्या सदर्न कमांडद्वारे केलेल्या इतर प्रसिद्ध ऑपरेशन्सची आणि जुनागढ, गोवा आणि हैदराबाद संस्थानांना भारतीय गणराज्यात विलीन करताना बजावलेल्या कामगीरीची आठवण करून दिली. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा पाठपुरावा करून ते साध्य करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले.
सदर्न कमांडच्या तुकड्या आणि शाळकरी मुलांनी कार्यक्रमात सादर केलेल्या केलेल्या सांस्कृतिक सादरीकरणाने रेसकोर्स येथील कार्यक्रमाच्या उत्सवी वातावरण भर घातली. या सादरीकरणात भांगडा आणि लेझिम शो, पाईप बँड डिस्प्ले, एरोबिक्स आणि योगा, झुंबा डान्स, आर्मी पब्लिक स्कूलचे मराठी नृत्य सादरीकरण यांचा समावेश होता.
‘विजय रन’ मधील विजेत्यांना आर्मी कमांडरच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 'सदर्न स्टार विजय रन' हे दक्षिण कमांडद्वारे पुढील महिन्यात आर्मी डे परेड सेलिब्रेशन निमित्त नियोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा भाग आहे. आर्मी डे परेड 15 जानेवारी 2023 रोजी बेंगळुरू येथे होत आहे, आणि यानिमित्ताने दक्षिण भारतातील शूर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.