आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचा फक्त 'मुंबई पॅटर्न':बारामती हे काही वेगळे मिशन नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमचे मिशन महाराष्ट्र, मिशन इंडिया सुरु आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्याचमुळे बारामती हे काही वेगळे मिशन नाही. मिशन बारामतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमचा फक्त 'मुंबई पॅटर्न' असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उत्तरप्रदेश मधील अमेठी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने पराभव केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी या मतदार संघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सितारामन दौऱ्यावर

या दृष्टीने सितारामन या बारामतीच्या दौऱ्यावर येणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिवसभर बारामती लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी गाठीभेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

रामोशी समाजाचे मोठे योगदान

पुण्यात फडणवीस म्हणाले, पुण्यातील आजचा माझा दौरा राजकीय हेतूने नाही. उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी मी पुरंदर येथे आलो आहे. रामोशी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र हा समाज मागे राहिला. त्यामुळे नवीन सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल रामोशी समाजाशी संवाद साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

आदरांजली देण्यासाठी दौरा

राजे उमाजी नाईक यांना आदरांजली देण्यासाठी हा दौरा आहे. रामोशी समाज हा नेहमीच वंचित राहिलेला आहे. त्यामुळे नवीन सरकार या रामोशी समाजासाठी काहीतरी करू इच्छिते आणि त्याच निमित्ताने रामोशी समाजाच्या अडीअडचणी आणि त्यांच्या समस्या जाणण्यासाठी मी आज याठिकाणी चाललो असल्याचे ते म्हणाले.

एकत्र बसून ठरवू

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वच्च न्यायालयात झालेल्या चिन्ह गोटावण्याबद्दल झालेल्या आजच्या सुनावणीबाबत आपल्याला माहिती नाही. याबाबत कोर्टात केसची सुनावणी सुरू आहे त्यावर बोलणं योग्य नाही. कोर्टाबद्दल बोलताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. आमच्या सोबत ओरिजिनल शिवसेना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र बसून ठरवू. आमचा फक्त मुंबई पॅटर्न आहे असे वक्तव्य यांनी केले.

पतंगबाजी करू नका

एकनाथ शिंदे गटाची जी खरी शिवसेना आहे ती आमच्याबरोबर आहे. बाकी उरलेल्या शिल्लकसेनेचे आम्हाला माहीत नाही. मात्र मीडियाने उगाच पतंगबाजी करू नये. असे म्हणत फडणवीसांनी टोले लगावले.

बातम्या आणखी आहेत...