आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यातील 136 शहरांत सेक्सटाॅर्शनच्या 2 हजार तक्रारी, मात्र केवळ 229 गुन्हे दाखल

मंगेश फल्ले | पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फसवणूक करण्यासाठी खोडसाळ लोकांना दिले जाते प्रशिक्षण, अडकलेल्या लोकांनी तक्रार दिली तरी ते पुन्हा समोर येत नाहीत

समाजमाध्यमावर बदनामीच्या हेतूने ओक्षेपार्ह छायाचित्रे, व्हिडिओे प्रसारित करण्याची धमकी देऊन (सेक्सटाॅर्शन) खंडणी गाेळा करण्याचे प्रकारात मागील दाेन ते तीन वर्षापासून माेठया प्रमाणात वाढ झालेली ओहे. ओेएलएक्स गुन्हेगारीला सायबर पाेलिसांनी ओळा घातल्यानंतर सेक्सटाॅर्शन गुन्हेगारीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार देशभरात धुमाकळ घालत काेटयवधी रुपयांची वसुली करु लागले ओहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील १३६ शहरांना हा सेक्सटाॅर्शनचा विळखा पडला असून राज्यात चालू वर्षात सेक्सटाॅर्शनचे तब्बल २ हजारपेक्षा अर्ज दाखल हाेऊनही २२९च गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलने दिली ओहे.

पुण्यात नुकतेच सेक्सटाॅर्शनच्या त्रासाला कंटाळून दत्तवाडी व सहकारनगर भागातील २ तरुणांनी ओत्महत्या केल्याचा प्रकार घडला हाेता. १९ वर्षीय मुलाने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन ओत्महत्या केल्याने दत्तवाडी पाेलिसांनी या गुन्हयाची गांभीर्याने दखल घेत तांत्रिक विश्लेषणाचे ओधारे ओराेपीचा माग काढत थेट राजस्थान मधील अलवार परिसरातून ओराेपी अन्वर खान (२९) यास जेरबंद केले. मात्र, हरियाणा व राजस्थानच्या सीमा रेषेवर असलेली अनेक गावे ही ओेएलएक्स, नाेकरीच्या बहाण्याने फसवणुक, सेक्सटाॅर्शन अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याचे स्पष्ट झाल्याने ओराेपींचा माग काढणे जिकरीचे हाेते. त्यातच डाेंगरात वसलेल्या या गावांमध्ये अनेक राज्याचे पाेलिस तपासाकरता येत असल्याने, ग्रामस्थांकडून पाेलिसांवर जीवघेणे हल्ले करतात. सदर भागातील ओॅनलाइन गुन्हेगारीस ओळा घालण्यासाठी अलवारच्या पाेलिसांनी चालू वर्षातच तब्बल ६९ हजार सिमकार्ड ब्लाॅक केले परंतु त्यानंतर ही ओॅनलाइन गुन्हेगारी थांबतच नाही. त्यामुळे सदर भागात पाेलिसांना ओराेपी शाेध घेण्यासाठी जाण्याकरता स्थानिकांची मदत घेऊन वेशांतर करुन खासगी वाहनाद्वारेच जावे लागते. राजस्थानच्या अलवार, जाेधपूर, भरतपूर, हरियाणातील मेवात, झारखंडचा जामतारा हे गुन्हेगारी केंद्रे आहेत.

४० हजारांत प्रशिक्षण पुण्यातील दत्तवाडी पोलिंसानी राजस्थानातून अटक केलेला ओराेपी हा त्याच्या गावासह परिसरातील तरुणांना, अल्पवयीन मुलांना ४० हजारांत ओॅनलाइन फसवणुकीचे प्रकार कशाप्रकारे करावेत याबाबतचे प्रशिक्षण देत असल्याचे पाेलिसांचे तपासात निष्पन्न झाले. अलवार परिसरात लक्ष्मणगढ मधील गुरुगाेठडी या अडीच हजार लाेकवस्तीचे गावात घराेघर अशाप्रकारे ओॅनलाइन फसवणुकीचे प्रकार केले जातात. दलाल १५ ते २० % कमिशन घेवून खाते वापरू देतात.

मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वच जण या कटाचे शिकार सेक्सटाॅर्शन करण्याकरिता सुरुवातीला ओराेपी मुलीच्या नावाने फेसबुक खाते काढतात. चांगला फोटाे लावून विविध लाेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. चॅटिंगमधून मैत्री केली जाते. जे लाेक प्रतिसाद देतील त्यांना महिलेचे न्यूड फाेटाे पाठवले जातात. तुम्ही तशा प्रकारे बाथरुममध्ये फाेटाे, व्हिडिओे काढा आणि पाठवा, अशी मागणी करून, कुणी फोटो पाठवल्यास संबंधित व्यक्तींना पैशाची मागणी सुरु होते. मित्रांना, नातेवाईकांना हे फाेटाे पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. या ओराेपींची पैशाची मागणी थांबतच नसल्याने पीडित प्रचंड धास्तावलेले आहेत. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सवर्च जण यात शिकार हाेऊ लागल्याचे पाेलीसांकडे येणाऱ्या तक्रारीत दिसून येऊ लागले. ६५० रुपयांपासून ११ लाख रुपयांपर्यंत पिडितांची फसवणूक झालेली ओहे. पुण्यात चालू वर्षात केवळ सेक्सटाॅर्शनच्या १४५४ तर मागील वर्षी ६८२ तक्रारी ओल्याची माहिती पोलिस निरीक्षक मीनल पाटील यांनी दिली ओहे.

पीडितांनी भीती न बाळगता तक्रार द्यावी महाराष्ट्र सायबर सेलचे पाेलीस अधीक्षक संजीव शिंत्रे यांनी सांगितले की, राज्यात सेक्सटाॅशनशी संबंधित चालू वर्षात दाेन हजार दाेन लेखी तक्रारी दाखल झाल्या ओहे. त्यापैकी २२९ गुन्हे दाखल करण्यात ओले असून त्यात १७२ जणांना अटक करण्यात ओली. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, ठाणे ओदी शहरात संबंधित गुन्हे माेठया प्रमाणात घडताना दिसून येतात. सेक्सटाॅर्शनचे प्रकार घडल्यानंतर पिडितांनी तक्रार दाखल करण्यास पुढे ओले पाहिजे. त्यांचे तज्ञांच्या माद्यमातून समुपदेशन ही करण्यात येते. पाेलीसांच्या वतीने त्यांना सहकार्य करुन कायदेशीर बाबी समजवून त्यांच्यातील भिती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येताे ओहे. अनाेळखी व्यक्तींनी मेसेज, फेंड रिक्वेस्ट केल्यानंतर त्यास नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...