आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Pune
 • Outbreak Of Lumpy Skin Disease In Animals In 8 Districts Of The State Is A Relief As There Is No Transmission Of Viruses From Animals To Humans.

राज्यातील 8 जिल्ह्यात जनावरांत लंपी त्वचारोगाचा प्रार्दुभाव:बाधा झालेल्या पशूंपासून मानवास विषाणूंचा संसर्ग नसल्याने दिलासा

पुणेएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

गाेवंश आणि महिष वर्गातील जनावारांना हाेणारा लंपी स्किन हा विषाणूजनय त्वचाराेग आहे. हा राेग कीटकांपासून पसरत असून ताे जनावरांपासून मानवात संक्रमित हाेत नाही. पशुधनात वेगाने पसरणारा हा संसर्गजन्य आजार असला, तरी पशुधन दगाविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

या आठ जिल्ह्यांत प्रादुर्भाव

राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकाेला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड या आठ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 71 गावात या राेगाचा प्रार्दुभाव झाला अाहे. बाधित गावांतील एकूण 762 पशुधनापैकी 560 जनावरे उपचाराने बरी झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंर्वधन आयुक्तालयाचे आयुक्त सचिन्द्र पातप सिंह यांनी गुरुवारी दिली.

चिनावलमध्ये पहिली केस

सिंह म्हणाले, सध्या भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यात पशुधनात लंपी स्कीन राेगाचा प्रार्दुभाव दिसून आला आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात चिनावल या गावात सर्वप्रथम चार ऑगस्टला जनावरांत या राेगाची लागण झाल्याचे आढळून आले.

सन 2020-21 मध्ये राज्यातील 26 जिल्हयात तर 2021-22 मध्ये दहा जिल्हयात लम्पी स्कीन राेग आढळून आला आहे. बाधित क्षेत्राच्या पाच किलाेमीटर परिघातील 301 गावातील एकूण एक लाख 342 पशुधनास राज्यात लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात नऊ व पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील एक असे दहा बाधित जनावरांचा मृत्यु झाला.

अशी घ्या काळजी

 • बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गाेठ्यांची स्वच्छता राखावी.
 • निराेगी जनावारांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
 • गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये.
 • लंपी स्कीन राेगाची लक्षणे जनावरात आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संर्पक करावा.
 • बाधित गावात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
 • साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचे निराेगी भागात प्रवेश टाळावा.
 • गाेठ्यात त्र्यस्थांच्या भेटी टाळाव्यात.
 • निर्जुंतक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
 • राेगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यु झाल्यास कमीत कमी आठ फूट खाेल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
 • त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
 • राेगप्रार्दुभाव झाल्यास जनावरांची खरेदी विक्री थांबवावी.

येथे करा संपर्क

औषध उपचाराने हा आजार बरा हाेत असून अधिक माहितीसाठी टाेल फ्री क्रमांक 18002330418 अथवा राज्यस्तरीय काॅल सेंटर मधील पशुसेवेचा टाेल फ्री क्रमांक 1962 तात्काळ संर्पक साधावा असे आवाहन पशुसंर्वधन विभागा मार्फत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...