आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीनचे फेज-2 ट्रायल:पुण्यातील हॉस्पिटलमध्ये 5 जणांना देण्यात आली कोव्हिशील्ड लस, 2 महीने ऑब्जर्वेशनमध्ये राहणार; डिसेंबरमध्ये व्हॅक्सीन येण्याची शक्यता

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये व्हॅक्सीन ट्रायल करण्यात आले
  • चांगला रिझल्ट आल्यावर 300 ते 350 जणांना व्हॅक्सीन दिली जाईल

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका कंपनी भारतातील सीरम इंस्टीट्यूटसोबत मिळून व्हॅक्सीन तयार करत आहे. भारतात हे व्हॅक्सीन कोव्हिशील्ड (AZD1222)नावाने लॉन्च होईल. पुण्यात आजपासून या व्हॅक्सीनच्या फेज-2 चे हृयूमन ट्रायल सुरू झाले आहे. दुपारी 1 वाजता पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील 5 जणांना याचा पहिला डोज देण्यात आला. यांना पुढील 2 महीने मेडिकल ऑब्जर्वेशनमध्ये ठेवले जाईल. रिझल्ट चांगल्या आल्यानंतर 300 ते 350 जणांना ही व्हॅक्सीन दिली जाईल. ट्रायल यशस्वी झाल्यास डिसेंबरपर्यंत व्हॅक्सीन बाजारात आणली जाईल.

एक अब्ज लस तयार करण्याचा करार

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलचे आरोग्य संचालक डॉ. संजय लालवानी यांनी सांगितले की, आम्ही ट्रायलसाठी सहा जणांची निवड केली आहे. या सर्वांची स्क्रीनिंग प्रक्रीया संपली आहे. आरटी-पीसीआर आणि अँटीबॉडी परीक्षणदेखील झाले आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने देशात व्हॅक्सीनच्या 1 अब्ज लसीचे उत्पादन करण्यासाठी ब्रिटिश-स्वीडिश फर्म एस्ट्राजेनेकासोबत करार केला आहे.

आतापर्यंत व्हॅक्सीन सुरक्षित सिद्ध झाली

मेडिकल जर्नल द लॅसेंटमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, ही व्हॅक्सीन पुर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक आहे. या माहितीनंतर ऑक्सफोर्डची व्हॅक्सीन फ्रंट रनर व्हॅक्सीन यादीत आली आहे. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीनेदेखील म्हटले की, AZD1222 व्हॅक्सीन दिल्याने चांगला इम्यून रिस्पॉन्स मिळाला आहे.