आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''माझे मातीतील पाय मातीतच राहणार असून मी नावाने मोठी झाले तरी शेतीशी असलेले नाते कधी सोडणार नाही. देशी-विदेशी पैशांच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या, मात्र आता देशी बियांची बँक महत्वाची आहे. आपल्या गॅलरीत, बंगल्यापुढे घरातली एखादी फरशी काढावी, पण घरातला भाजीपाला घरातच पिकवावा, असे मत पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
महा एनजीओ फेडरेशनतर्फे मॉडेल कॅालनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात सन्मान स्त्री शक्तीचा; उत्तुंग कर्त्वृत्वाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या उज्ज्वल कार्याचा सन्मान राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्काराने केला. कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार मेधा कुलकर्णी, क्लीन सायन्स अँड टेक्नॉ. इंडियाचे कृष्णकुमार बूब, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, फेडरेशनचे संचालक गणेश बाकले, अमोल उंबरजे व कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले आदी उपस्थित होते.
डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रचिती सुरु, पूजा ढोले, वर्षा जवळ, शुभांगी कलकेरी, श्रद्धा ढवन, डॉ. स्नेहल धोंडे, डिंपल गजवानी, निर्मला थोरमोठे, आशा भट्ट, डॉ.ॲड. जयाजी उभे, ऐश्वर्या मुनीश्वर, डॉ. गौरी शिउरकर, चंदा तिवाडी, आशा ढाकणे, मंगल देशमुख, शैलजा देशपांडे, मानसी भोईटे, गीता बेलपत्रे, शुभांगी झेंडे, अंजली तापडिया, प्रीती म्हस्के, कीर्ती भराडिया, कल्पना कोकस, माधुरी सहस्रबुद्धे यांना सन्मानित करण्यात आले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, माझ्यासमोर असणाऱ्या २८ क्षेत्रातील महिला या आपल्या पुढे आदर्श आहेत. एक स्त्री एकावेळी अनेक काम करत असते, तिच्या त्या गुणांचे विशेष कौतुक झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.