आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्हा पुन्हा एक परिवर्तनाचे पाऊल टाकायला सज्ज झाला आहे. उद्या जिल्ह्यातील तब्बल 29 ग्रामपंचायतीसह खडकवासला मतदार संघात विधा प्रथावर बंदी घालण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.
सकारात्मक प्रतिसाद
आज एकविसाव्या शतकात विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र, आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून आले येते. पतीच्या निधनावेळी पतीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते. महाराष्ट्र शासनाने व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे.
चाकणकरांचा पुढाकार
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व 4 प्रभागातील नागरिकांनी उद्या दि. 9 जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे. अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो 100 टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल.
मतदार संघ प्रथामुक्त
मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसूत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात त्या राहत असलेला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.