आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:विठुरायाच्या पंढरीला परतीच्या पावसाचा तडाखा, पंढरीनगरी पाण्याने तुडूंब भरली, पाहा PHOTO

पंढरपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रभागा नदीला 13 वर्षानंतर पूर आलेला आहे. त्यामुळे नदी पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे

विठुरायाच्या पंढरीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चंद्रभागा नदीला 13 वर्षानंतर पूर आलेला आहे. त्यामुळे नदी पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर नदीकिरानी असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरले असल्यामुळे नदीकिनारच्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मराठवाड्याच्या काही भागात नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले असल्याचे पाहायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...