आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, जानकर यांनी संबंधित भेट ही केवळ एका कामाकरिता हाेती व ते काम पवार यांनी मार्गी लावल्याचा खुलासा केला आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ जानकर यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. जानकर हे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे ते अध्यक्षही आहेत. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांना भाऊ मानले आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच आठवड्यात पवार काका-पुतण्यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्या संदर्भात २ डिसेंबरला अजित पवार आणि ३ डिसेंबरला शरद पवार यांची भेट घेतली असून कारखान्याच्या परवान्याचे काम झाले आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. भेट घेतल्याचे देवेंद्र फडणवीसांनाही सांगितले होते, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.