आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एकापाठाेपाठ एक परीक्षांचे घाेटाेळे बाहेर येत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणा आणि ढिसाळ कारभाराचे हे लक्षण आहे. यांना एकही परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. काेणतीही यंत्रणा नीटपणे काम करत नाही. राज्य सरकारचे कुणावरच नियंत्रण नाही. सरकारमध्ये गाेंधळाची परिस्थिती असल्याने राज्य सरकार यंत्रणा याेग्य प्रकारे सांभाळू शकत नसल्याने यंत्रणा पेपर फाेडून गैरप्रकार करत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
नागपूर आणि अकाेला येथील विधान परिषदेच्या जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले याबाबत प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, काँग्रेसने नागपूरच्या निवडणुकीत पाेरखेळ केला. आधी भाजपचा स्थानिक नगरसेवक घेऊन त्यास तिकीट देणे, त्यानंतर तिकीट बदलून अपक्षाला पाठिंबा दिला गेला. ताे उमेदवारही पराभूत झाला. माजी खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा बिनविराेध करून देण्यात आली हाेती. सातव यांच्या पत्नीलाही विधान परिषदेची जागा बिनवराेध दिली. काँग्रेसला सांगण्यात आले हाेते की, यंत्रणेवरील ताण हलका करून सहा जागांसाठीच्या प्रत्येक पक्षाच्या सध्याच्या विभागणीप्रमाणे जागा बिनविराेध करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले व मंत्री सुनील केदार यांच्यातील वाद या निवडणुकीच्या निमित्ताने समाेर आला. माझे महाविकास आघाडीला आव्हान आहे की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घ्या. तुम्हाला कळेल, अध्यक्ष कुणाचा हाेऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातच विकास हाेऊ शकताे हे जनतेला समजले असून ते निवडणुकीत भाजपलाच मतदान करतात, असा दावाही त्यांनी केला.
पक्षात उगीच कुणावरही अन्याय नाही
पक्षाने आम्हाला हे शिकवले की तिकीट पक्षाचेच असते, मतांचा गठ्ठा पक्षाचा असताे. त्यामुळे कुणी माझे तिकीट कापले म्हणणे चुकीचे आहे. तुमचे कर्तृत्व पाहून तुम्हाला पक्ष उमेदवारी देत असतो. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन व्हाेट बँक तयार हाेत असतो. थाेडासा तुमचा चेहरा, तुमचा प्रभाव उपयाेगी पडताे. पक्ष कुणावर उगीच अन्याय करत नाही. चंद्रशेखर बावनकुळे, विनाेद तावडे, पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले नसून त्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, असे पाटील म्हणाले.
नाचता येईना अंगण वाकडे
महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी सत्ता एकत्रित ठेवायची, त्यानंतर एकमेकांवर कुरघाेड्या करायच्या, हे त्यांचे राजकारण आहे. ममतांसमाेर वेगळे राजकारण व काँग्रेस नेत्यांसमाेर वेगळे राजकारण, असे शिवसेनेची धरसाेड राजकारण सुरू आहे. निवडणुका जिंकता न आल्याने आराेप करणे हा प्रकार नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार असल्याची टीकाही पाटील यांनी या वेळी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.