आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्ड फ्लू:परभणी, लातुरातच कोंबड्यांत बर्ड फ्लू; इतर जागी पाेपट, कावळे, चिमण्यांत संसर्ग

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यवतमाळ : 200 कोंबड्यांसह 8 मोर मृत

राज्यात १३ जिल्ह्यांत ९७ संशयितरीत्या मृत पक्षांच्या नमुन्यांपैकी १८ नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. परभणी जिल्ह्यात मुरंबा, तर लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात २ ठिकाणी काेंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. मुंबई, बीड, ठाणे या ठिकाणी बगळे, पाेपट, कावळे, चिमणी या पक्षीवर्गात बर्ड फ्लूची लक्षणे आढळली. देशभरात आतापर्यंत कुठेही मानवात बर्ड फ्लूची लक्षणे दिसून आली नसल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिली. ते म्हणाले, मुंबई, घोडबंदर, परभणीतील मुरुंबा इत्यादी ठिकाणी ८ जानेवारीपासून १८३९ विविध पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. लातूर येथील नमुने पॉझिटिव्ह आल्याने ते संसर्गग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. मुरुंब्यात ५,५०० तर लातूरच्या केंद्रेवाडीत १० हजार कोंबड्या नष्ट केल्या जातील. शासनाच्या निर्देशानुसार पोल्ट्री व्यावसायिकांना भरपाई देण्यात येईल.

यवतमाळ : २०० कोंबड्यांसह ८ मोर मृत
पांढरकवडा तालुक्यात लिंगटी या गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये मंगळवारी एकाच वेळी २०० कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. तर आर्णी तालुक्यातील अंबोडा येथे ८ मोर मृतावस्थेत आढळले.

बातम्या आणखी आहेत...