आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुबर्इवरुन मुंबर्इ, पुणेसह देशातील इतर शहरात सोने तस्करीचे विविध प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र, दुबर्इवरुन महागड्या वस्तू पोस्टाने मागवून कर चुकवण्याचा प्रकार मुंबई कस्टम विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणात पोलिसांनी दुबर्इवरुन आलेली तब्बल 40 पार्सल जप्त करत आयफोन, ड्रोन, अॅपल घडयाळे, महागडे सिगरेट असा सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशाप्रकारे राज्यात प्रथमच परदेशातून व्यवसायिक कामाकरिताचे वस्तू कस्टम कर चुकवून पोस्टाचे माध्यमातून तस्करी केल्या जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
कस्टम विभागाच्या गुप्तचर खात्यास माहिती मिळाली होती की, करचुकवेगिरी करण्यासाठी आयफोन, ड्रोन, अॅपल घडयाळ, महागडे सिगरेट व्यवसायिक विक्रीकरिता पोस्टाच्या माध्यमातून तस्करी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे मुंबईतील कस्टम विभागाच्या गुप्तचर खात्याने अंधेरीतील एमआयडीसी पोस्ट ऑफिस, विदेश डाक भवन, विलेपार्लेतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस या तीन ठिकाणी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
यावेळी एकूण 1470 आयफोन, 322 अॅपल घडयाळे, 64 ड्रोन, 41 एअर पॉडस, 391 सिगरेट पाकिटे आणि 36 अॅटटो पार्टस असा 15 कोटी रुपये बाजारभाव किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोस्टाच्या माध्यमातून या व्यवसायिक वापरासाठीचे वस्तू दुबर्इवरुन बनावट नाव आणि पत्ते पाठवून कस्टमचा कर चुकवून मागवून घेतल्या जात होत्या. ही बाब उघडकीस आल्याची माहिती मुंबर्इ कस्टम झोन तीनमध्ये कार्यरत असलेल्या निवारक आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधान आयुक्त अलोक चोप्रा यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास संयुक्त आयुक्त डॉ. श्रीकांत अवचार करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.