आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संसदरत्न:पहिल्याच वर्षी खासदार अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर, फेसबुकवरुन दिली माहिती 

शिरूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मतदारसंघातील जनतेच्या समस्यांसोबतच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या लोकसभेतील पहिल्या पाच खासदारांमध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांनी स्थान

शिरुरचे राष्ट्रवादी काँगसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या फेसबुक पेजवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. यासोबतच आपल्या मतदारसंघातील जनतेचे त्यांनी आभार मानले आहे. दरम्यान पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणानुसार आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्यांसोबतच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या लोकसभेतील पहिल्या पाच खासदारांमध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांनी स्थान मिळवले. यामध्ये खासदार अमोल कोल्हेंचे नाव आहे. 

सतराव्या लोकसभेच्या पहिल्याच वर्षी खासदार अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतः अमोल कोल्हे यांनी फेसबुकवरुन याविषयी माहिती दिली. 'शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला सेवा करण्याची संधी दिल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार, हा सन्मान मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा आहे, म्हणूनच मी तुम्हा सर्वांना अर्पण करतो.' असे म्हणत अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत. 

लोकसभेतील पहिल्या पाच खासदारांमध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांनी स्थान मिळवले. प्रश्न विचारण्याबरोबरच सभागृहात होणाऱ्या विविध चर्चांमध्ये हिरिरीने सहभाग आणि सर्वाधिक 89 टक्के उपस्थिती नोंदवून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या पाच खासदारांमध्ये धुळे येथील भाजप खासदार आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

31 मेपर्यंतची लोकसभेतील आकडेवारी गृहीत धरून त्याआधारे हा अहवाल तयार केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या सुळे यांनी सर्वाधिक 212 प्रश्न उपस्थित केले. तसेच सभागृहामधील विविध 97 चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या. त्यांची उपस्थितीही सर्वाधिक म्हणजे 88.75 इतकी असल्याचे समोर आले आहे. डॉ. सुभाष भामरे व डॉ. कोल्हे यांनी प्रत्येकी 202 प्रश्न उपस्थित केले. संसदेत पाऊल टाकल्यापासून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून प्रश्न विचारण्यातही बाजी मारली आहे. या तिघांनंतर भाजपचे मध्य प्रदेशातील मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता यांनी 198 व जमशेदपूरचे बिद्युत महतो यांनी 195 प्रश्न उपस्थित केले.

0