आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुडमधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले होते. या गौरव यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सावरकरजी के सम्मान मैं कोथरुडकर मैदान मैं, मैं भी सावरकर अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आशा भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पर्वतीतही भर पावसात यात्रा
पर्वती विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ आणि पुणे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात पर्वती मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा रविवारी काढण्यात आली. भर पावसात ही यात्रा सुरू असल्याने कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, पावसातही सदर यात्रा सुरू ठेवून त्यानंतर सभा पार पडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.