आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Passenger's Luggage Stolen During Train Journey; Consumer Grievance Redressal Commission Slaps Central Railway, Orders It To Pay Rs Five Lakh With 6 Percent Interest

रेल्वे प्रवासात प्रवाशाचे सामान चोरीला:सेंट्रल रेल्वेला ग्राहक आयोगाचा दणका; 5 लाख रुपये 6 टक्के व्याजासह देण्याचे आदेश

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाच्या चोरीला गेलेल्या वस्तू शोधण्यामध्ये असमर्थ ठरलेल्या सेंट्रल रेल्वेला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदारांचे 5 लाख 12 हजार 700 रुपये 27 डिसेंबर 2019 पासून वार्षिक 6 टक्के व्याजाने देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला.

याबाबत येरवडा परिसरातील वडगांव शेरी भागातील रहिवाशी महिलेने अ‍ॅड. अर्धापुरे यांच्यामार्फत स्टेशन इनजार्ज, सेंट्रल रेल्वे, मनमाड आणि दि डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर विरुद्ध अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार त्यांच्यामुलासह 26 नोव्हेंबर 2017 रोजी रेल्वेने एसी टु-टेअरमधून मथुरा ते अल्नावर असा प्रवास करत होत्या. त्या दोघांना बर्थ क्रमांक 5 आणि 6 देण्यात आला होता. 27 नोव्हेंबर रोजी रेल्वे मनमाड येथे आली असता दोन अनोळखी व्यक्ती त्यांनी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. त्यातील एकाने त्याचे पैसे सीटखाली पडल्याची बतावणी केली. तक्रारदारांनी खातरजमा करण्यासाठी सीटखाली पाहत असताना दुसऱ्या व्यक्तीने तक्रारदारांच्या सीटवर त्यांनी ठेवलेली पर्स पळवली. तक्रारदारांनी 27 डिसेंबर 2017 रोजी मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार त्यामध्ये घड्याळ, कानातील रिंग यासह अन्य असा मिळून 5 लाख 12 हजार 700 रुपयांचे मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद केले.

6 जून 2018 रोजी मनमाड रेल्वे पोलिसांनी या घटनेचा तपास लागत नसल्याने तक्रार बंद करत असल्याचे सांगितले. आरिक्षत कक्षांमध्ये प्रवास करताना सरदरीच घटना घडली. आरक्षीत कक्षांमध्ये त्रयस्त व्यक्ती न येण्याची काळजी घेणे हे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे रेल्वेने भरपाई द्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली. वारंवार विनंती करूनही रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेत 5 लाख 12 हजार 700 रुपये 18 टक्के व्याजाने परत देण्याची मागणी केली. रेल्वेला संधी देऊनही आयोगात हजर न झाल्याने त्यांच्या विरुद्ध आदेश पारीत करण्यात आला. हे प्रकरण 24 सप्टेंबर 2021 रोजी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वर्ग करण्यात आले.

तक्रारदारांनी दाखल केलेली शपथपत्रे, लेखी युक्तीवाद, वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिर्णय याचे अवलोकर करून तक्रारदाराला 5 लाख 12 हजार 700 रुपये 6 टक्के व्याजाने, तसेच नुकसानभरपाई पोटी 25 हजार, तक्रारीच्या खर्चापोटी 3 हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...