आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा धसका:शाईफेक टाळण्यासाठी पाटलांनी लावले शील्ड ; मंत्री चंद्रकांत पाटलांची पवनाथडी यात्रेला भेट

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी मध्ये शाईफेक घटना घडली होती. त्यानंतर पाटील यांना मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आला. तरी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा मोठा धसका घेतला आहे. शाईफेक घटना टाळण्यासाठी मंत्री पाटील हे पिंपरीतील कार्यक्रमात तोंडला पारदर्शक मास्क परिधान करुन आल्याने तो चर्चेचा विषय ठरले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना मार्गदर्शन केले. पवनाथडी जत्रेत एकूण ४०० स्टॉल आहेत, तर ५६० बचतगटांनी यात्रेत सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...