आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Pune
 • Patients Doubled In 15 Days, 98% Cured, Although The Number Of Patients In The State Is Increasing Day By Day, The Situation Is Not Serious

15 दिवसांत कोरोना रुग्ण दुप्पट:राज्यात 4 हजार 165 नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ, मात्र गंभीर स्थिती नाही

पुणे10 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी गंभीर रुग्ण परिस्थिती नाही. मागील १५ दिवसांच्या कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली असून शुक्रवारी एकूण ४ हजार १६५ कोरोनाबाधित आढळले. तर ३ हजार ४७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असून ९७.८६ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या एकूण २१ हजार ७४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना रुग्णसंख्या वाढ अशी

 • १ जून : १०८१
 • ५ जून : १४९४
 • १० जून : ३०८१
 • १५ जून : ४०२४
 • १७ जून : ४१६५.

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ
- राज्यातील कोरोना बाधितांचा मृत्युदर १.८६ टक्के.
- एकूण ८,१५,१७,३९९ नमुन्यांपैकी ७९,२७,८६२ पाॅझिटिव्ह.
- आतापर्यंत एकूण ७७,५८,२३० रुग्ण बरे होऊन घरी परतले.
- रुग्णवाढ होणाऱ्या शहरांत मुंबई (सक्रिय रुग्ण संख्या १३३०४), ठाणे (४४४२), पुणे (१५७१), पालघर (७०४), रायगड (७५५),नागपूर (३२०), नाशिक (१२०) यांचा समावेश आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत सक्रिय रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...