आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात म्हाडाच्या घरांची उद्या सोडत:उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते 5 हजार 68 घरांच्या ऑनलाइन नाेंदणीचा होणार शुभारंभ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्यामार्फेत पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील पाच हजार ६८ घरांची साेडत गुरुवारी जाहीर हाेणार आहे. म्हाडाच्या साेडतीत अत्यल्प, निम्न मध्यम आणि उच्च उत्पन्न गट आहे. या उत्पन्न गटासाठी ठराविक उत्पन्न मर्यादाही असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.

नऊ जूनला शुभारंभ

सदर म्हाडाच्या पाच हजार ६८ घरांच्या ऑनलाइन नाेंदणीचा शुभारंभ नऊ जून राेजी दुपारी दाेन वाजता मुंबईतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी म्हाडाच्या विविध गृहनिर्माण याेजनेतील शिल्लक राहिलेल्या २७८, बांधकाम व्यावसायिकांकडून २० टक्के काेट्यातून उपलब्ध झालेल्या दाेन हजार ८४५ व म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण याेजनेतील एक हजार ९४५ सदानिकांचा समावेश असणार आहे.

उत्पन्न मर्यादेत बदल

घर घेण्यासाठी इच्छुकांनी उत्पन्न मर्यादेनुसार साेडतीत घरासाठी अर्ज भरावा लागेल. त्यासाठी ऑनलाइन घर नाेंदणीही करावी लागाले. म्हाडाने घर खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...